loader image

मनमाड शहर राष्ट्रवादी तर्फे दिवाळी आनंदाची निमित्त आश्रमशाळेत फराळ वाटप

Oct 20, 2022

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डोणगाव रोड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंद बोथरा यांचे वतीने दरवर्षी दिवाळी निमित्त या विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात येतो. यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेतर्फे राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे यांनी बालगोपालाना मार्गदर्शन केले तसेच मनमाड शहरात असेच लोकोपयोगी व विधायक उपक्रम राबविण्याचा मानस बोलून दाखविला. सदर उपक्रमाबद्दल संस्था तसेच विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक गोगड, शहर कार्याध्यक्ष नाना शिंदे, महिला अध्यक्ष अपर्णा देशमुख, अहमदनगर येथील प्रसिद्ध व्यापारी ईश्वर सुराणा, सखाराम पंडित, ओबीसी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, योगेश जाधव, अमोल गांगुर्डे, संदीप पाटील, श्रद्धा आहिरे, माया झाल्टे, पवन आहिरे, अक्षय देशमुख, संदीप जगताप, शुभम गायकवाड आदि उपस्थित होते. संस्थेतर्फे पवार सर व पगार सर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन आनंद बोथरा यांनी केले होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.