मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरीवर्ग तसेच व्यापारी वर्गांना कळविण्यात येते की दिवाळीचा सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून या सण उत्साहात फुलांना मोठी मागणी असते. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील २६ गावांचा सहभाग असल्याने सर्व फुल उत्पादक शेतकरी बांधवांना कळावे यासाठी माहिती प्रसारित केली आहे. यात म्हटले आहे की, मनमाड कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी निमित्ताने शनिवार ता २१ व २२ ऑक्टोबर असे दोन दिवस रोजी दुपारी ४ : ३० ते लिलाव संपेपर्यंत झेंडू फुलांचा लिलाव सुरू राहणार असल्याचे कळविले आहे.
फुल लिलावाची वैशिष्ठ्ये
१) शेतकरी बांधवांना विक्री केलेल्या झेंडू फुलांचे पेमेंट हे तात्काळ रोख स्वरुपात अदा केले जाईल.
२) फुलांचा उघड पद्धतीने – मोळका किंवा कॅरेटमध्ये लिलाव केला जाईल.
३) फुल खरेदीसाठी नाशिक, मुंबई, गुजरात व इतर ठिकाणावरून व्यापारी उपस्थित राहणार आहे.
४) वजनमापासाठी बाजार समितीचे आवारातच वे-ब्रिजची सोय उपलब्ध आहे.
शेतकरी बांधवांनी आपला झेंडू फुले शेतमाल हा प्रतवारी करून मनमाड बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा. असे आवाहन केले आहे.