loader image

खेलो इंडिया महिला रँकिंग राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धा – जय भवानी व्यायाम शाळेच्या आठ खेळाडू राज्य वेटलिफ्टिंग संघात

Oct 22, 2022


मोदीनगर उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या दुसऱ्या खेलो इंडिया महिला रँकिंग राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जयभवानी व्यायामशाळेच्या आठ खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात स्थान मिळवले आहे 40 किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे,नूतन बाबासाहेब दराडे 55 किलो,वैष्णवी वाल्मिक इप्पर 59 किलो,वैष्णवी जनार्धन उगले 64 किलो,संध्या भास्कर सरोदे 71 किलो,आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता वाल्मिक काळे 71 किलो,धनश्री विनोद बेदाडे 76 किलो, करिष्मा रफिक शाह 76 किलो

भारतातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मोदीनगर उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होत असून प्रत्येक वजनी गटातील विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर,सचिव प्रमोद चोळकर,भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.