loader image

दिवळीनिमित्त चव्हाण कुटुंबाने साकारली ‘तोरणा किल्ल्याची’ प्रतिकृती

Oct 26, 2022

मनमाड : ( योगेश म्हस्के ) महाराष्ट्रात दिवाळी मध्ये घरगुती किल्ला बनवणे ही अनेक वर्षांपासून चालत असणारी परंपरा आहे.सध्याच्या डिजिटल युगात ही परंपरा काही प्रमाणात मागे पडत असताना दिसत आहे. दिवाळीतील हीच परंपरा जपण्याचे काम हे मनमाड येथील चव्हाण कुटुंब दरवर्षी करत असतात.

मनमाड येथील सिव्हिल इंजिनिअर श्री विक्रम चव्हाण आणि श्री अमर चव्हाण हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून दिवाळी मध्ये महाराष्ट्रातील आपल्या शौर्याचा इतिहास सांगणारे गड-किल्ले यांची प्रतिकृती साकारत असतात. घरातील तसेच शहरातील लहान मुलांना आपल्या गड-किल्यांच्या इतिहासाची माहिती मिळावी , या उद्देशाने हे किल्यांची निर्मिती करत असतात.मागील वर्षी चव्हाण परिवाराकडून स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्याची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली होती.यंदाच्या वर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील तोरणा किल्याची प्रतिकृतीची निर्मिती केली आहे. यामध्ये श्री तोरणाई मंदिर , श्री मेंगाई मंदिर , दारूखाना कोठार , लखड खाना , महार टाके,तीन टाके , झुंझार माची , बुदला माची , चिलखती बुरुज , रडतोंडी बुरुज , हनुमान बुरुज , चित्ता दरवाजा , कोकण दरवाजा , चीनला दरवाजा , वकजाई दरवाजा , बिनी दरवाज , कोठी दरवाजा , सदर ,महार वाडा , घोडेजीन खांब , विशाळा खडक अशी तोरणा गडावरील महत्वाची ठिकाणे दाखवण्यात आली आहे.

गड निर्मिती करण्यासाठी दगड ,माती, विटा , पोते आदी प्रकारच्या पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर करण्यात आलेला असुन ,
किल्ला बनवण्यासाठी शिवराज चव्हाण, श्रावणी चव्हाण, सेजल चव्हाण, आराध्य चव्हाण, रीतिक चव्हाण, आदित्य चव्हाण, वेदांत निकम आदींनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.