loader image

आता वैद्यकीय अभ्यासक्रम होणार मराठी माध्यमातूनही – महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Oct 29, 2022


मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. MBBS सह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. मात्र मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जातील.

इंग्रजीतील पुस्तकांचे भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एक समिती याची पाहणी आणि मांडणी करणार आहे.

मराठी माध्यमातील आणि विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा इंग्रजीतून वैद्यकीय शिक्षण घेताना अडचणी येतात. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो,त्यामुळे स्पर्धेच्या युगात असे विद्यार्थी मागे राहण्याची भिती असते. पण आता मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेता येईल. त्याचा फायदा निश्चितपणे हजारो विद्यार्थ्यांना होईल यात शंका नाही.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.