गुजरात राज्यातील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना आज सायंकाळी घडली असून या पूलावर असणारे चारशे पेक्षा जास्त लोक नदीत बुडले असण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हा पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते. यावेळी पूलावर असणारे चारशे पेक्षा जास्त लोक नदीत बुड्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती केली होती. गुजरातचे मंत्र्यांनी बचाव कार्य सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दुःख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्याचे काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे.”