loader image

भूमिअभिलेख कार्यालयाला चपलांचा हार – रीपाई युवा शाखेचे आंदोलन

Nov 2, 2022


मनमाड शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात काल मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवक शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. रिपाइंचे युवक तालुका अध्यक्ष गुरू निकाळे, शहर सचिव प्रमोद आहीरे यांच्या नेतृत्वाखाली येथील कायम बंद असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या बंद दरवाजाला चपलांचा हार घालून निषेध करण्यात आला. कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी श्री नितनवरे हे कायम मोजणीला आहे, मीटिंगला आहे असे सांगून कार्यालय बंद ठेवले जाते.गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची प्रलंबित कामे होत नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आंदोलन केल्याचे गुरू निकाळे यांनी सांगितले.यावेळी योगेश पगारे,विकास शिंदे,चंद्रमणी उबाळे,सागर केदारे आदीसह नागरिक उपस्थित होते. भूमी अभिलेख कार्यालयाने कामाच्या पद्धतीत सुधारणा न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा गुरू नीकाळे यांनी दिला आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मनमाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्रमांक 4 विभागातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे कायम करून भोगवाटेदार वर्ग दोन चे उतारे मिळण्यासाठी गेल्या 6 ते 8 महिन्यापासून मोजणी पूर्ण न केल्यामुळे संबंधित कार्यालयातील अधिकार्‍यांशी संपर्क होत नाही शहरातील अनेक प्रकरण प्रलंबित असून नागरिक त्रस्त असून भूमिअभिलेख कार्यालय प्रशासना विरोधात निषेध नोंदविण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.