loader image
[ays_poll id=7]

अंधेरी पोटनिवडणुकीत अवघे ३१.७४% मतदान

Nov 3, 2022


महाराष्ट्र विधानसभेच्या 166- अंधेरी पूर्व या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी 7 वाजेपासून प्रत्यक्ष मतदानास होऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीवरून सुरुवातीपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आज अखेर प्रत्यक्ष मतदान झाले. त्यातून अख 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत.

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली होती. आता ऋतुजा लटके यांच्यासमोर सहा अन्य उमेदवारांचं आव्हान आहे.

या पोटनिवडणुकीसाठी हे 7 उमेदवार रिंगणात

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
३. श्री. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. श्री. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. श्री. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 256 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. पोलिसांसह 1600 कर्मचारी आणि CRPF च्या 5 कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत. आता 6 नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. तसं तर भाजपच्या उमेदवाराच्या माघारीनंतर ऋतुजा लटके यांचा रस्ता सुकर झाला आहे मात्र अंतिम निकाल हाती येईस्तोवर सर्वांचं लक्ष अंधेरी पूर्वकडे असणार आहे.


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.