मध्य रेल्वे चे प्रधान मुख्य सामग्री प्रबंधक श्री.आर.एल.राणा (मुंबई) हे मनमाड वर्कशॉप ला भेट देण्यासाठी आले असता ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ मनमाड मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुख्य कारख़ाना प्रबंधक श्री मयंक सिंह उपस्थित होते.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनिल सोनवणे, राकेश ताठे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी मनमाड वर्कशॉप मधील समस्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. कारख़ाना भेटीवर आलेल्या प्रधान मुख्य सामग्री प्रबंधक यांनी कारख़ाना व स्टोर डेपो यांना प्रत्येकी 5 -5 हजार रुपये रोख पुरस्कार घोषित केले.

नॅशनल हायवे ७५३ जे वर जलवाहिनी गळतीने अपघाताचा धोका
नांदगाव, मारुती जगधने चाळीसगाव नांदगाव रोडवरील नॅशनल हायवे क्रमांक ७५३ जे वर नांदगाव येथील रहदारी...