नांदगांव तालुक्यातील आमोदे येथे साकोरा जिल्हा परिषदेच्या गटांतील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शुक्रवार (दि ४ ) रोजी जनता दरबार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय आरोग्यमंत्री तथा कुटूंब कल्याण राज्यमंत्री मा भारतीताई पवार नांदगांवचे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे , गटविकास अधिकारी गणेश चौधरी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे जयश्री दौंड दत्तराज छाजेड भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे उपस्थित होते.
आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत सर्वप्रथम वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारींचा पाऊसच पडला यानंतरशेती पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी , प्रधानमंत्री घरकुल योजने पासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी तुला पासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांच्या वतीने करण्यात आली.
नांदगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस होऊन शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊन देखील कृषी विभाग महसूल विभाग तसेच पंचायत समिती विभागाच्या वतीने करण्यात आलेले पंचनामे ही चुकीचे असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील नुकसान न झाल्याच्या अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आल्याने आमदार कांदे यांनी ह्याच विषयाला हात घालत खोटे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली कारवाई केली नसेल तर काय कारवाई करणार असल्याचा प्रश्न आमदार कांदे यांनी उपस्थित करत आमदार कांदे यांच्या या प्रश्नावर संबंधित चुकीचे पंचनामे करणाराऱ्या कर्मचाऱ्याना नोटीसा बजावणार असल्याची माहिती तालुका कृषिअधिकारी जगदीश पाटील यांनी दिली, तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मी ॲक्शन मोड मध्ये आल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय करणार नसल्याचा इशारा आमदार कांदे यांनी वेळी देत गरज पडल्यास जिल्हाधिक कार्यालयासमोर उपोषणाला देखील बसण्याचा इशारा यावेळी आमदार कांदेनी दिला,
तर वीज मंडळाच्या बाबत झालेल्या तक्रारींना उत्तर देताना अभियंता वाटपाडे यांनी शेती पंपाची 33 कोटी थकबाकी शेतकऱ्यांकडे असल्यास सांगत 45 कोटीची कामे प्रस्तावित असल्याचे सांगितलं यापुढे शेतकऱ्यांना नियमित व उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यात येईल आश्वासन यावेळी दिले आमोदे येथे नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे पाठवावा असे आदेश आमदार कांदे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत
आमोदे गावाचा पोखरा योजनेत समावेश व्हावा यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचा आमदार कांदे यांनी यावेळी सांगितलं तर पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे लवकरच मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कांदे यांनी यावेळी आश्वासित केलं प्रमोद येथील गिरणा नदीवर पूल व्हावा यासाठी या वर्षाच्या बजेटमध्ये आपण या कामाचा समावेश करणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले गिरणा नदीवर केटीवेअर यासाठी केटीवेअरच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करत सहा महिन्याच्या आत आपण हे काम तडीस नेणार असल्याचेही आश्वासन एवढी आमदार कांदे यांनी यावेळी दिले तसेच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ७८ खेडी योजनेच्या कामासाठी २४१ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर निघाल्याची माहिती देखील कांदे यांनी दिली
शेती पिकाचे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करा शासकीय आदेशाची वाट पाहू नका असे आदेश महसूल विभागाला राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी दिले महसूल व कृषी विभागाच्या सर्वाधिक तक्रारी या आढावा बैठकीत प्राप्त झाल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष घालून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे सूचना देखील यावेळी पवार यांनी दिल्या
घरकुल योजनेत खरे लाभार्थी वंचित राहिल्या त्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याबाबत तात्काळ गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशा सूचना राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी केल्यानंतर या प्रश्नाला उत्तर देताना पपत्र ड याचा सर्वे 2016 मध्ये झाला असून 2019 मध्ये ऑनलाइन यादी पंचायत समितीला प्राप्त झाली असून यामध्ये काही लाभार्थी रिजल्ट झाल्याची माहिती गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली तर रिजेक्ट झालेल्या घरकुलांमध्ये सर्वाधिक 332 लाभार्थी वेहळगाव येथील असल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले यावर राज्यमंत्री पवार यांनी वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची प्राधान्यक्रम यादी मंजुरीसाठी वरिष्ठ विभागाकडे पाठवण्याच्या सूचना यावेळी केल्या केंद्रातला मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे भाजपा सरकार जनतेच्या हितासाठीच असून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवा असे निर्देश देखील यावेळी भारतीताई पवार यांनी यावेळी दिलेत कोरोना काळात २१९ कोटी व्हॅक्सिनेशन करण्यास भारत देश अग्रेसर असल्याचे देखील यावेळी सांगितले.
मंगळवेढा येथील मधुकर राठोड या शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी वादळी वाऱ्याने नुकसान होऊन देखील भरपाई मिळाली नसल्या तर सांगत मला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी केली तर मळगाव येथील ग्रामस्थांना मालेगाव जाण्यासाठी रस्त्याच्या कामावी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून रस्त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रत्नाकर आहेर यांनी केला यांनी करत दुर्लक्ष केले जात असल्याचे सागितले तर तर या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे खैरनार यांनी उत्तर देताना हा रस्ता मालेगाव येथील जिल्हा परिषद कडे असल्याने अडचणी येत असल्याचे सांगितलं याबाबत राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी गंभीर दखल दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ मीटिंग घेऊन हा विषय मार्गी लावावा अशा सूचना यावेळी संबंधित उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना केल्या या आढावा बैठकीला जयश्री दौंड भावरराव निकम दत्तराज छाजेड गणेश शिंदे किरण देवरे प्रमोद भाबड रमेश बोरसे सुभाष कुटे उमेश उगले संदीप पगार ,नरेंद्र पवार दीपक देसले सजन तात्या कवडे , आमोदे ग्रामपंचायतीचे सरपंच वैशाली पगार उपसरपंच भूषण पगार रमेश पगार अण्णासाहेब पगार बोराळ्याचे राजेंद्र पवार कळमदरीचे सरपंच मनोज पगार यांच्यासह परिसरातील अनेक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदगांव विधानसभा मतदार संघातील साकोरा गट ते कळवाडी गट जोडणारा आमोदे गिरणा नदीवरील पुलासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री तथा कु कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारतीताई पवार तसेच नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी आपल्या मनोगत आतून सांगितले.
या प्रसंगी सर्व विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्ष पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.