loader image

गौरवास्पद – मूळच्या नांदगावच्या असलेल्या क्षितिजा भास्कर कदम यांचा नॉटिंगहॅम (लंडन) ट्रेंट विद्यापिठात एमबीए ( डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक, ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन

Nov 6, 2022


नांदगाव – लंडन येथील नॉटिंहम ट्रेंट विद्यापिठात नाशिक जिल्ह्यातील क्षितिजा भास्कर कदम यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला असून याबद्दल नॉटिंहम विद्यापीठातर्फे पदवीदान समारंभात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

क्षितिजा कदम यांना पूर्णवेळ एमबीए प्रोग्राम अंतिम परीक्षक मंडळाचे निकाल विद्यापीठाचे प्रशासक जॅम केली यांनी पत्राद्वारे कळविला असून त्यात नमूद केले आहे की, एमबीए (डिजिटल मार्केटिंग) अभ्यासक्रमाचा अभ्यास यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. “एमबीए एक्सलन्ससाठी एनबीएस डीनचे पारितोषिक” देखील प्रदान केले आहे. पदवीदान समारंभात पारितोषिक वाचन केले जाईल तसेच ग्रॅज्युएशन ब्रोशरमध्ये आपले नाव व तपशील समाविष्ट केला जाईल. याचबरोबर आम्ही तुम्हाला योग्यवेळी बक्षीस आणि प्रमाणपत्र पाठवू. तुमच्या अतुलनीय कामगिरीबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.

क्षितिजा कदम या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील मूळ रहिवाशी असून त्या माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांच्या कन्या आहेत. क्षितिजा कदम यांचे संपूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमात झाले आहे, हे विशेष उल्लेखनीय होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण छाजेड विद्यालय, व्ही. जे. हायस्कुल तसेच कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे झाले. तसेच महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या केटीएचएम मध्ये झाले आहे. याकाळात संस्थाचालक, शिक्षक, प्राध्यापक यांचे मार्गदर्शन तिला लाभले.याचबरोबर क्षितिजा कदम यांनी पुणे येथील रानडे इन्स्टिट्यूटमधून एमए एमसीजे ही पदवी विशेष प्रविण्यासह मिळविली. प्रारंभी पुणे येथील एका मीडिया मॅनेजमेंट कंपनीत काम केले. त्यानंतर मुंबई येथे जेनिसिस या कंपनीत काम करीत असतांना प्रो कबड्डीचे मीडिया मॅनेजमेंटची जबाबदारी तिने यशस्वीरित्या पार पाडली. तसेच भारतातील ऍड फॅक्कर नामांकित जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. तेथूनच तिने नॉटिंगम विद्यापीठात एमबीए (डिजिटल मार्केटिंग) साठी स्कॉलरशिपसह प्रवेश मिळविला. नॉटिंगम विद्यापीठाचे इस्तंबूल येथे प्रतिनिधित्व करण्याचा विशेष सन्मानही क्षितिजा कदम मिळाला. तेथे ३० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. क्षितिजा कदम या मराठमोळ्या विद्यार्थींनीने इंग्लंडमध्ये अतुलनीय यश मिळविल्या बद्दल तिचे विशेष कौतुक केले जात आहे.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.