loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Nov 6, 2022

मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना ६१ व्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते भूगोल विभागाचे डॉ. गणेश गांगुर्डे यांनी पी.पी.टी द्वारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जन्मापासून तर त्यांच्या सपूर्ण जीवन कार्याचा आढावा घेतला. पी.पी टी मध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जीवन कार्यातील दुर्मिळ छायाचित्रांचा वापर करून सादरीकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ पवनसिंग परदेशी यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, कुलसचिव श्री समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.