loader image

मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

Nov 7, 2022


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त मा. संपदा दीदी हिरे यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हरीश आडके यांनी कबड्डी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती खेळाडूंना दिली तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संवर्धक कै. लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. खेळात केवळ विजय महत्त्वाचा नसून पराजय सुद्धा भविष्यातल्या विजयाचा मानदंड असतो असा आत्मविश्वास डॉ. हरीश आडके यांनी उपस्थित खेळाळूना दिला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी संपदा दीदी हिरे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. मुलांसाठीच्या या कबड्डी स्पर्धेसाठी पुणे, नगर, नाशिक इत्यादी ठिकाणाहून कबड्डी संघ सहभागी झाले होते. दुपारी ४:००वाजता या स्पर्धांना प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून डॉ. पाटील यांनी कबड्डी खेळासाठी असलेला महाविद्यालयाचा इतिहास सांगितला व ऐनवेळी चांदवड येथे होणाऱ्या स्पर्धांसाठी मनमाड महाविद्यालय खुले करून दिले व निकोप वातावरणात स्पर्धा पार पडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे, संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य हरीश आडके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाचे सहाय्यक संचालक डॉ. दत्ता महादम,जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रमोद आंबेकर, स्पर्धा निरीक्षक प्रमोद शिंदे, राष्ट्रीय दर्जाचे पंच सतीश सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.उपस्थित प्रमुख मान्यवराचे सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हरीश आडके यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण पाटील यांनी विविध क्रीडा संघाच्या प्रमुखांचा महाविद्यालयातर्फे सत्कार केला.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळवलेले हर्षाली मिस्कर, करुणा रमेश गाडे, नूतन दराडे,वृषाली निवृत्ती गांगुर्डे, दिया किशोर व्यवहारे, विना संतोष आहेर या खेळाडूचा सन्मान संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित झालेले निवड समितीचे अध्यक्ष दत्ता शिंपी, प्रा. शांताराम ढमाले, निवड समिती सदस्य प्रा.रावसाहेब गराड, आदी यावेळी उपस्थित होते. तसेच , पुणे शहर येथून प्रा अभिजित, अहमदनगर विभागातून डॉ रवींद्र खंदारे, नाशिक विभागातून दीपक जुंदरे आदींचा सन्मान महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य पाटील यांनी केला.
कबड्डी स्पर्धेच्या नियम व अटी तसेच स्पर्धेच्या मर्यादा याबाबत स्पर्धकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. दत्ता महादम यांनी मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय होळकर, महाविद्यालयाचे प्रथम क्रीडा संचालक प्रा पी.टी. वाघ, नगरसेवक सुनील पाटील, पुणे जिल्ह्यातून सुनील पानसरे, भाऊसाहेब थोरात, भीमराव पाटील,नाशिक विभागातून ज्ञानेश्वर गडाख, प्रदीप वाघमारे आधी मान्यवरांचा प्राचार्य पाटील यांनी यथोचित सन्मान केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कनिष्ठ विभागाचे क्रीडा शिक्षक महेंद्र वानखेडे, एन.सी.सी विभागाचे कॅप्टन प्रकाश बर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पवन सिंग परदेशी, श्री प्रशांत सानप श्री रोहन बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.