मनमाड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिनांक ९ नोव्हेंबर रोजी नगर पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांनी पाचारण करत प्रशासनाकडून शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगर पालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली. सदर चर्चेत मुख्याधिकारी सचिन पटेल,पाणीपुरवठा अभियंता श्री.काजळे, बांधकाम विभागाचे श्री.गवळी, नगर रचना चे अज्जू भाई शेख तसेच आरोग्य विभागाचे श्री.सोनवणे यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनियमित पाणीपुरवठा,शहरातील अतिक्रमण, वाहनांचा अडथळा, मोकाट जनावरे तसेच कोंडवाडा, नवीन स्वच्छता गृहे तसेच महिलांसाठी मध्यवर्ती ठिकाणी स्वच्छता गृहे, स्मशान भूमीतील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे, आदी विविध प्रश्नांसंदर्भात नगर पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती या वेळेस मुख्याधिकारी पटेल यांनी ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितिचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, कार्याध्यक्ष नरेंद्र कांबळे एस.एम.भाले,कृष्णाजी पगारे,रामभाऊ गवळी,दिलीप आव्हाड, आर.बी. ढेंगळे, गोपीनाथ गायकवाड,श्री देवकर यांना दिली.नगर पालिका प्रशासनाने समितीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देत चर्चेस पाचारण केल्याबद्दल समितीच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले.

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा
बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...