स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा ‘ बाल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. पंडित नेहरुजींना लहान मुले खूप आवडत, त्यांच्यात रममाण होणे त्यांचे नित्याचे होते. मुले प्रेमाने त्यांना ‘चाचा’ म्हणून संबोधत असत. आपल्या लाघवी स्वभामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटत. म्हणून भारतात १४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरुजींचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो.
रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून चाचा नेहरू यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
– देव हिरे. ( कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)