स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिन म्हणजे बालदिन मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मुक्तांगण येथील संस्कार खेळवाडी शाळेतील बालगोपालाना खाऊ वाटप करण्यात आला, त्यानंतर डोणगाव रोड येथील आश्रम शाळेस राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड यांचे तर्फे संपूर्ण वर्षभरासाठी दररोज दोन दैनिक वृत्तपत्रांचे वितरण, तसेच विद्यार्थ्यांची आवड जोपासली जावी यासाठी सार्वजनिक वाचनालय येथून वार्षिक पुस्तकांची सोय करून देण्यात आली. या उपक्रमांबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, युवती शहराध्यक्ष कोमल निकाळे, आनंद बोथरा, सौ.प्रियंका बोथरा, शाळे तर्फे नंदकिशोर पगार सर, वृत्तपत्र वितरक पटेल आदि उपस्थित होते.

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश
"मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...