loader image

श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन समाधी सोहळ्यास भक्ती भावाने प्रारंभ

Nov 16, 2022


मनमाड : (योगेश म्हस्के )शहराचा अध्यात्मिक व सांस्कृतिक मानदंड असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा उत्सवास आज बुधवारपासून येथील छ.शिवाजी नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात उत्साहात प्रारंभ झाला.

येथील श्री दत्तोपासक मंडळाच्या संयोजनाखाली नियमितपणे सुरू असलेल्या या उत्सवाचे यंदाचे ५८ वे वर्ष आहे , आज बुधवारी सकाळी उत्सव शुभारंभानिमित्त सकाळी नरेश गुजराथी व स्वाती गुजराथी यांच्या हस्ते प्रतिमा व पादुकांची महापूजा झाली व सात दिवसीय सामुदायिक ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणास सुरुवात झाली . बुधवार दि १६ ते मंगळवार दि २२ पर्यंत सात दिवस सुरू राहणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी काकड आरती,पाध्यपुजा,श्री विष्णू सहस्रनाम,गीता पठण,श्री ज्ञानेश्वरी पारायण,सामुदायिक हरिपाठ यासह सायंकाळी विविध मंडळाची भजने होणार आहेत.

शुक्रवार दि ८ व शनिवार दि ९ रोजी सायंकाळी आळंदी येथील चक्राकीत महाराज यांचे प्रवचन होणार आहे.सोमवार दि २१ रोजी सायंकाळी नगर प्रदक्षिणा ( दिंडी) निघणार आहे , मंगळवार दि २२ रोजी उत्सव समाप्तीनिमित्त सकाळी चरण पादुका महाअभिषेक,समाधी प्रसंगाचे अभंग,दुपारी महाआरतीनंतर महाप्रसाद वितरण व सायंकाळी कल्पेश महाराज भागवत यांचे काल्याचे कीर्तन होईल. दत्तोपासक मंडळाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाठ,सचिव गणेश गरूड,सहसचिव प्रशांत कुलकर्णी,उपाध्यक्ष किरण कात्रे,अशोक कुलकर्णी,आनंद जोशी आदी संयोजन करीत आहेत ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण वाचक सुरेश कासार आहेत तर उत्सवाचे पौरीहित्य हेमंत कुलकर्णी हे करीत आहेत. या उत्सव सोहळ्यास पहिल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी सुरू आहे.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.