loader image

अनारक्षित तिकिटांबाबत रेल्वे मंत्रालयाचा निर्णय – प्रवाशांना मिळणार दिलासा

Nov 17, 2022

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवास करायचा म्हटले तर प्रवाशांना आधी तिकीट बुक करावे लागते आणि त्याकरता स्टेशनला जाऊन रांगेत उभे राहून मग तिकीट मिळायचे. म्हणुनच भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेच्या काही महत्वाच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये रेल्वे मंत्रालयाने अनारक्षित तिकिटांबाबत निर्णय दिला असून त्यात तुम्हाला आता पूर्वीपेक्षा जास्त अंतरावरून अॅपद्वारे घरी बसून तिकीट बुक करू शकाल. म्हणजे ज्या स्थानकापासून तुम्हाला प्रवास सुरू करायचा आहे, त्या स्टेशनपासून तुम्ही खूप दूर असलात तरीही तुम्ही तिकीट बुक करू शकता.त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार असून प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका होणार आहे. तसेच रेल्वेच्या नव्या नियमामुळे तिकीट बुकिंग सुविधा अत्यंत सुलभ होणार आहे.
दरम्यान, रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षित आणि अनारक्षित अशी दोन प्रकारची तिकिटे बुक केली जातात. त्यात आरक्षित तिकिटे ऑनलाइन किंवा अॅपद्वारे कुठूनही कोणत्याही ठिकाणासाठी बुक केली जाऊ शकतात, परंतु अनारक्षित तिकिटे प्रवास सुरू होण्याच्या स्थानकापासून मर्यादित अंतरापर्यंतच बुक करता येतात. मात्र आता दोन किमीचे अंतर 20 किमी करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.