नांदगाव शहरातून जाणारा जुना पांझण रस्ता, वडाळकर वस्ती, आदिवासी वस्ती, पठाडे वस्तीला जाण्यासाठीच्या रस्त्यावरील पूल व रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. सदर मार्ग हा शहरातून जाणारा असून शहरातील इतर भागांना जोडणारा तसेच मुख्य स्मशानभूमीला जोडणारा मुख्य रस्ता असून सध्या या मार्गावरील पूल हा अपूर्ण अवस्थेत असून सदर पूल व रस्ता त्वरित पूर्ण करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन स्थानिक नागरिकांनी दिले आहे. सदर निवेदनावर त्वरित कारवाई न झाल्यास विवेक हॉस्पीटल ते स्मशानभूमी येथे तिरडी यात्रा व सरणावर बसून मागणी पूर्ण होईपर्यंत जन आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर नगरसेवक वाल्मिक टिळेकर, सागर आहेर, विशाल वडघुले, प्रवीण सोमासे, संतोष गुप्ता, अनिल आहेर, सुनील सोनावणे आदींच्या सह्या आहेत.

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश
"मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...