loader image

छत्रे विद्यालयात वाड्मय छंद मंडळाचे उद्घाटन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

Nov 19, 2022


मनमाड : बालसाहित्य लिहिणे ही अवघड बाब असून मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांच्याशी समरस होऊन त्यांच्या मनातील प्रश्न सार्थपणे ‘सांग ना आई..? या संदीप देशपांडे यांच्या पुस्तकात उमटले आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ शंकर बोराडे यांनी केले. येथील छत्रे विद्यालयात वाड:मय छंद मंडळ उदघाटन व शिक्षक, पत्रकार, कवी संदीप देशपांडे यांच्या ‘सांग न आई..?’ या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री प्रवीण पाटील , कवी चित्रकार श्री विष्णू थोरे, गटशिक्षणाधिकारी कवी श्री. प्रमोद चिंचोले , संस्थेचे अध्यक्ष श्री पी जी दिंडोरकर, सचिव श्री दिनेश धारवाडकर, संचालक श्री प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक श्री. आर.एन.थोरात , उपमुख्याध्यापक श्री संदीप देशपांडे, वरिष्ठ पर्यवेक्षक श्री पी आर व्यवहारे, पर्यवेक्षिका सौ.एस.एस.पोतदार ,मुख्य लिपिक श्री भोसले, प्राथमिक विभागाचे प्रमुख श्री दिघोळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री जाधव, पूर्व प्राथमिक प्रमुख सौ.गवते उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी संदीप देशपांडे यांच्या बालदिनी मुलांसमोर पुस्तक प्रकाशन करण्याच्या संकल्पनेचे कौतुक करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देशपांडे एस्. पी. यांनी केले. श्री ढोकणे सरांच्या प्रास्ताविकानंतर श्री. पाखले व श्री ईलग यांच्या गीत मंचाने स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.त्याचे संयोजन सौ.अंबर्डेकर एस.एस.व सौ. देशपांडे एस.यू. यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते वाड्मय छंद मंडळाचे उद्घाटन व बालकविता संग्रह ‘सांग ना आई..?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
शाळेचे उपमुख्याध्यापक श्री संदीप देशपांडे सर यांनी पुस्तकाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले. श्री थोरे सरांनी कविता सादर करून तसेच त्यांचे अनुभव कथन करून कार्यक्रमात रंगत आणली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.थोरात सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले एनडीएसटी संस्थेचे चेअरमन श्री. बाळासाहेब ढोबळे, कार्यवाह भाऊसाहेब शिरसाट, संचालक श्री. मोहन चकोर, श्री मंगेश सूर्यवंशी श्री ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या वतीने श्री.अरुण पवार सर यांनी श्री देशपांडे सरांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. श्री देशपांडे ए. व्ही. यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वाड्मय छंद मंडळाचे प्रमुख आणि सर्व सदस्यांनी उत्तम‌ संयोजन केले.या कार्यक्रमाची अतिशय सुंदर अशी कार्यक्रम पत्रिका तयार करून श्री ठाकरे आर् एम यांनी सहकार्य केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.