loader image

मतदार नोंदणी आणि आधार लिंक अभियानास मनमाडकरांचा प्रतिसाद

Nov 19, 2022

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेनेतर्फे शनिवार व रविवार या दोन दिवसीय मतदार नोंदणी अभियानाची आज सुरुवात करण्यात आली.

मनमाड शहरातील नागरिकांना मतदार नोंदणी आधार लिंक करणे या सर्व प्रक्रियेसाठी सहज सोय व्हावी म्हणून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनानंतर शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी व सदस्यांनी आज दिनांक 19 नोव्हेंबर शनिवार रोजी व उद्या 20 नोव्हेंबर रविवार रोजी दोन दिवसीय मतदार नोंदणी व आधार लिंक करणे अभियानाचे आयोजन केले आहे.

आज शनिवारी मनमाड मधील 15 ठिकाणी या अभियानाअंतर्गत बी एल ओ सहित मनमाड शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी नागरिकांना फॉर्म उपलब्ध करून दीले, तसेच फॉर्म भरून देण्यासाठी सहकार्य केले

मतदार नोंदणी अभियानास मनमाड शहरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत या ठिकाणी गर्दी केली.

नागरिकांच्या मतदार नोंदणी आधार लिंक करणे या संबंधित कामे सहज सोपे झाल्यामुळे नागरिकांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन मनमाड शहर शिवसेनेने केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.