मनमाड शहरा लगताच असलेल्या कऱ्ही ग्रामपंचायत हद्दीतील घुगे वस्ती येथील डी.पी. ही गेल्या वर्षभरापासून बंद आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच शेतकरी बांधवाना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डी.पी.बंद असल्यामुळे ऐन पावसाळ्यातही शेतकर्यांना पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, वारंवार पाठपुरावा करून देखील महावितरणने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनमाड शहराच्या वतीने महावितरणाच्या मनमानी कारभार विरोधात सोमवार दि.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी दु.११.३० वा. FCI रोड येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड यांनी कळविले आहे.

२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र झाले” या संदर्भात एक मराठी वृत्तांत
नांदगांव मारुती जगधने २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; राजकीय वर्तुळात खळबळ मुंबई, ता. ५ जुलै:...