loader image

क्रांतिवीर महात्मा फुले विद्यालय कुसुरचा कबड्डी व खो-खो संघ जिल्हा स्तरावर

Nov 24, 2022


येवला (प्रतिनिधी)
क्रीडा व युवकसेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित येवला तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मध्ये कुसुर ता.येवला येथील समता प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर महात्मा फुले विद्यालयाचा कबड्डी व खो-खो संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. एस.एन.डी.इंग्लिश मेडिअम स्कुल बाभूळगाव येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय १४ वर्षा खालील मुले कबड्डी व १७ वर्षा खालील खो-खो मुली संघाने चमकदार कामगिरी करून नेत्रदीपक यश मिळवले आहे.
कबड्डी व खो-खो संघ जिल्हा स्तरावर निवड झाल्या बद्दल तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील,समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे, सरचिटणीस दिनकर दाणे,संचालिका सुधाताई कोकाटे,मुख्याध्यापक एन.व्ही.शिंदे,क्रीडा शिक्षक तथा शालेय तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक नवनाथ उंडे यांनी अभिनंदन केले आहे.
दोन्ही संघास नवनाथ उंडे राजेंद्र जेजुरकर यांनी मार्गदर्शन केले.रमेश पवार,म्हातारबा जानराव,शरद शेजवळ, हिरामण काकड,खुशाल गायकवाड,योगेश्वर सोनवणे,सुभाष वाघेरे,खंडेराव गोरे,उत्तम खांडेकर,अशोक अहिरे,नाना मेंगळ, संजय फरताळे यांनी खेळाडूच्या यशासाठी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.