loader image
[ays_poll id=7]

जिल्हा मजूर संघ निवडणूक नांदगाव मधुन प्रमोद भाबड बिनविरोध

Nov 24, 2022

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन च्या पंचवार्षिक निवडणुकीत नांदगाव तालुका प्रतिनिधी म्हणून गुलाबभाऊ उर्फ प्रमोद सुदामराव भाबड यांची आज बिनविरोध निवड झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हरेश्वर सुर्वे ,व अनुजा सुशेन आहेर यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने श्री गुलाब भाऊ भाबड यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.
या प्रसंगी तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी प्रमोद भाऊ भाबड यांचे अभिनंदन केले, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी ज्ञानदेव भाऊ आहेर, हरेश्वर सुर्वे, नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास भाऊ आहेर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण दादा देवरे, नगराध्यक्ष राजेश कवडे, जी. प. सदस्य रमेश काका बोरसे, माजी सभापती सुभाष कुटे, विष्णू निकम सर, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर भाऊ लहाने, नांदगाव नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज दादा कवडे माजी उपसभापती राजेंद्र सांगळे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर संजय सांगळे, मनमाड चे माजी नगराध्यक्ष योगेश उर्फ बबलू भाऊ पाटील, संजय आहेर, अविनाशभाऊ इप्पर, सुनिल शेलार राजेंद्र पवार, अमोल शेठ नावंदर, राजेंद्र देशमुख, आनंद शेठ कासलीवालआदि यावेळी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.