loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान शाहिरी जलसाचे आयोजन

Nov 24, 2022


नाशिक (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा होत असून दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२:०० वा.येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार,नाशिक येथे विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव संयोजक सौरभ विजय (भा.प्र.से) व संचालक विभीषण चवरे,कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे यांनी दिली आहे.
भारतीय संविधानातील सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य,नागरिकांना सामाजिक,आर्थिक,राजकीय न्याय,स्वातंत्र्य,समानता,बंधुता, वैज्ञानिक दृष्टीकोन तत्व विचार लोकमानसात रुजविण्याच्या हेतूने भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे वाचन व विवेचन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कटारे करणार असून भारतीय संविधान शाहिरी कला अभियान तथा लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक प्रा.शरद शेजवळ आंबेडकरी शाहिरी जलसा अंतर्गत संविधान प्रचार,प्रसार व संवर्धन गीतांचे सादरीकरण करणार होणार आहे. शा. बाबुराव वाघमारे व संच भीमगीतांचे सादरीकरण होईल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालय संविधान दिन कार्यक्रम सादर करित असल्याची माहिती स्थानिक संयोजक राजेश जाधव यांनी दिली आहे.
संविधान दिन हा राष्ट्रीय कार्यक्रम असून जास्तीत जास्त नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव संयोजक सौरभ विजय (भा.प्र.से) व संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे स्थानिक संयोजक राजेश जाधव, समन्वयक रवी साळवे,सह समन्वयक मीना वाघ प्रयत्नशील आहेत.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.