loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील पिनकेश्वर महादेव मंदिर राहणार १५ जानेवारी पर्यंत बंद – देवस्थान चा निर्णय

Nov 25, 2022

गुरुवार ता. २४ जातेगावपासून उत्तरेस असलेले सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरावर श्री पिनाकेश्वर क्षेत्रावर महादेवाचे मंदिर असून, महादेवाची पिंडी, पार्वती देवी, गणपती व सरस्वती देवी आणि नंदी मूर्तीचे वज्रालेपनकरण्याचे काम हाती घेतल्याने देवस्थान १५ जानेवारी २०२३ पर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण यांनी दिली.

देवस्थानचे पुजारी दत्तात्रय भट, अमित कुलकर्णी, ट्रस्टचे उपाध्यक्ष

अंकुश वर्षेयांच्या हस्ते तेज्जोतारण विधी होऊन विधिवत मूर्तीपूजा करून कामाला प्रारंभ करण्यात आला. मूर्तीमधील देवपण काढून देवाच्या वज्रलेपन कामास सुरवात केली. वज्रालेपनाचे काम सरासरी १५ ते २० दिवस चालणार असून, त्यानंतर संक्रांतीपर्यंत देवाची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी योग्य मुहूर्त नसल्याने मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी येवू नये, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी १९६० च्या दशकात मंदिराचे हेमाडपंती पद्धतीने बांधकाम करून जीर्णोद्धार केला होता. या वेळी झाला आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.