loader image
[ays_poll id=7]

मनमाड नगरपालिकेत झाला संविधान दिन साजरा

Nov 26, 2022


आज दि.२६११/२०२२ रोजी
मनमाड नगर पालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमावेळी मनमाड नगर पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक श्री.आशोक पाईक यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.तसेच ठिक ११:०० वाजता श्री.आशोक पाईक यांनी नगर पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना संविधान दिनाचे महत्व सांगुन संविधानाची उद्देशिका खालीलपैकी पठन करून सामुदायकपणे शपथ घेवून प्रतिज्ञा घेतली की,
आम्ही भारताचे लोक,भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस: सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय:, विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व संधीची समानत:, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणी त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणी एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून: आमच्या संविधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर,१९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणी अधिनियमीत करून स्वत:प्रत अर्पण करीत आहोत.हि उद्देशिका वाचुन दाखवली.
अशाप्रकारे सर्व सरकारी कर्मचा-यांनी संविधानाची शपथ घेवून आजचा संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात केला.त्यानंतर सर्व कर्मचा-यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थित असलेले मनमाड नगर पालिकेचे राजेंद्र पाटील,नाना जाधव,तडवी साहेब,रामदास पगारे,किरन आहेर,अनिल गवळी,विकास गायकवाड,शैलेंद्र आहीरे,राजू चव्हान,राजेंद्र राख,आशोक कटारे,संतोष वानखेडे,अमोल बागूल,चंद्रकांत झाल्टे,प्रशांत कुलकर्णी,सुनिल दराडे,रईस शेख,सुशांत राजगुरू,रमेश थोरे,शंकर बेद,आंबादास बनसोडे,नितीन पाटील,करन चावरिया,किसन बेद,राकेश चावरिया,संजय छजलाना,संजय देठे,प्रकाश कदम,अमोल बहोत,जोगिंदर पालसिंग,वाल्मिक झाल्टे,रविंद्र सायबू इ.कर्मचारी व अधिकारी म.न.पा.सभागृहात उपस्थित होते.त्यानंतर सर्व सिटू कामगार संघटनेचे कॉ.रामदास पगारे व संवर्ग कर्मचारी संघटनेचे किरन आहेर यांनी सिटू कामगार भवन व मनमाड नगर पालिका पतसंस्था येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान दिनानिमीत्त आपले मनोगत व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.