loader image

अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर; गोपनीय माहिती देण्यासाठी दिला हेल्पलाईन क्रमांक

Nov 26, 2022


जिल्हयातील सर्व अवैध व्यवसायांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून श्री शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय विरोधी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या,

जिल्हयातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्याचे दृष्टीकोनातून दिनांक 16/11/2022 पासून ग्रामीण जिल्हा मुख्यालयाकडून आणखी (8) पथके पाठवून कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हयात चालणान्या अवैध प्रवाशी वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडूनही कारवाई सुरु करण्यात आली आहे. सदर सूचनांनुसार नाशिक ग्रामीण जिल्लायातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व विशेष पथके यांनी दिनांक 01/11/2022 ते 23/11/2022 यादरम्यान दारुबंदी जुगार, अवैध वाळू अंमली पदार्थ विरोधी कायदयातंर्गत खालील प्रमाणे भरीव कामगीरी केली आहे.

शिर्षक दाखल केसेस आरोपी जप्त मुद्देमाल
दारुबंदी २६४ 270 22,14,474
जुगार 50 87 12,07,799
एनडीपीएस 01 02 3,80,000
अवैध गुटखा विक्री  02 02 67,994
अवैध बायोडिझेल 01 05 1,01,68,248
अवैध वाळू वाहतुक  01 01 4,09,000
अवैध अग्नीशस्त्र बाळगणे 01 02 71,000
हॉटेल व ढाबा कारवाई 01 01
एकूण 321 370 1,45,18,515

नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांविरोधी एकूण (321) केसेस दाखल करुन एकूण रुपये 1,45,18,5150/- रक्कमेचा गांजा, दारू, गुटखा, बायोडिझेल, अवैध वाळू व जुगार रक्कम हस्तगत केली असुन एकूण (370) आरोपींविरुध्द कारवाई केली आहे. जिल्हयात चालणाऱ्या अवैध व्यवसायाविषयी नागरिकांना काही माहिती द्यावयाची

असल्यास Helpline क्रमांक 6262 256363 यावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन श्री शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.