loader image
[ays_poll id=7]

संविधान दिनानिमित्त एम.व्ही.पी. कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Nov 26, 2022

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे आज राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधत विद्यार्थांना संविधान अंमलात आणण्यासाठी संविधान सभा, मसुदा समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान यावर मार्गदर्शन करण्यात आले.
संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभिनव विकास शाळेचे श्री. आर. ए.कवडे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून संविधान अंमलात येण्यापूर्वी असलेली देशाची स्थिती, संविधानाची आवश्यकता, सार्वभौमत्व, अखंडता, समानता इ. मूल्ये, अधिकार, कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात १३ समित्या, २८४ सदस्य यांनी २ वर्ष ११ महिने व १८ दिवस कठोर परिश्रम करून आपल्याला २५१ पानांचे ३९५ कलमे, २२ विभाग आणि १२ परिशिष्टये अशी जगातील सर्वात मोठे संविधान आपल्याला दिलेले आहे. त्या संविधानाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल सर्वांचं योगदान आवश्यक असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. व्हीं. भाबड यांनी केले, प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागचे प्रा. गवळी सर यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. ए.बी.जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. ए.पी.नवले, प्रा. डी.एस पाटील, प्रा. गवळी, श्रीमती ठोके मॅडम, श्रीमती कर्डेल मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.