loader image
[ays_poll id=7]

आज चंपाषष्ठी निमित खंडेराव मंदिरात विविध कार्यक्रम

Nov 29, 2022

मनमाड : शहरातील भगतसिंग मैदानाजवळ पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिर आहे. माग पौर्णिमा दिनी मोठा यात्रा उत्सव होतो. तर श्री खंडेराव महाराज चंपाषष्ठी निमित्त मंदिरात नवरात्रोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केली जाते. गुरुवारपासून या मंदिरात श्री खंडेराव महाराज नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. या मंदिरात चंपाषष्ठी निमित्त विविध कार्यक्रम होतात. श्री खंडोबाची अभिषेक, पूजा, जागरण गोंधळ, भरीत भाकरीचा नैवेद्य, तळी भरणे आदि कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरे होत असतात. यानिमित्त श्री खंडेराव महाराज मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्री खंडोबा हे मनमाड शहराचे आराध्य दैवत आहे. तसेच अनेक घरांचे परिवाराची कुलदैवत देखील आहे. त्यामुळे येथे चंपाषष्ठी उत्सवाला मोठी परंपरा आहे. दरवर्षी चंपाषष्ठी उत्सव मंदिरात आणि घरोघरी भक्ती भावाने साजरा केला जातो. यानिमित्त श्री खंडोबाच्या दर्शनासाठी नागरिकांचे दररोज गर्दी सुरू आहे. चंपाषष्ठी पर्यंत हा उत्सव साजरा होईल. त्या अंतर्गत विविध कार्यक्रम देखील होणार आहेत.

मनमाड येथून भाविक दरवर्षी श्रीक्षेत्र जेजुरी येथे खंडोबाचा दर्शनालाही जात असतात. तसेच घरात शुभकार्य निमित्त खंडोबाचा जागरण गोंधळ कार्यक्रमही होत असतो. गुरुवारपासून धार्मिक वातावरणात चंपाषष्ठी निमित्त खंडोबाच्या नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त घरोघरी श्री खंडोबाच्या मूर्तीची चांग पूजा करून घटस्थापनाही करण्यात आली. दिवस चालणाऱ्या धार्मिक उत्सवात मल्हारी सहस्त्रनाम याग महाप्रसाद धार्मिक विधी ● आधी कार्यक्रम भक्ती भावाने साजरे केले जाणार आहेत.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.