मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इंडियन हायस्कूल मनमाड च्या शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेहमेलनाच्या कार्यक्रमास आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी लोकसभा सभापती माननीय श्रीमती सुमित्राताई महाजन या होत्या.
याप्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी इंडियन हायस्कूल मधून शिक्षण घेतलेले बहुसंख्य विद्यार्थी आज समाजातील मोठमोठ्या अधिकारी पदावर, प्रतिष्ठित व्यापारी तसेच डॉक्टर वकील इंजिनियर झाले या शाळेतील विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संचालक मंडळास भरभरून शुभेच्छा देत या शाळेने 200 वर्ष पूर्ण करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी आमदार साहेबांनी मनमाडकर यांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नां ना यश आले असून लवकरच या योजनेची भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते केले जाणार असल्याचेही सांगितले सोबतच त्याच दिवशी उपस्थित मंत्री महोदयांकडून मनमाड शहरासाठी एमआयडीसी घोषित करणार असल्याचेही सांगितले.
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे, जेष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, वाल्मीक आप्पा आंधळे, महावीर ललवाणी, उपजिल्हाप्रमुख नितीन सानप, युवासेना शहरप्रमुख योगेश भाऊ इमले, असिफ भाई शेख, वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक पिंटूभाऊ वाघ, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहरप्रमुख संगीताताई बागुल, अमीनभाई पटेल, दादाभाऊ घुगे, मुकुंद भाऊ झाल्टे, लोकेशभाऊ साबळे, अज्जू भाई शेख, लालाभाऊ नागरे, करण बहोत, केतन जाधव, सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर आदिंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरात 33 रक्त बॅगचे संकलन
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय,मनमाड येथे रक्तदान...