काल पासून बेपत्ता असलेला मनमाडचा नऊ वर्षाच्या बालकाची निर्घुण पणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार शहरात घडल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मध्यवस्तीतील भिलाटी परिसरात राहणाऱ्या लोकेश सुनील सोनवणे हा काल सायंकाळ पासून बेपत्ता होता. घरच्या मंडळींनी सर्व ठिकाणी शोध घेऊनही तो सापडला नाही. घरच्यांनी अखेर पोलिसात हरवल्याची नोंद दाखल केल्यानंतर पोलिस आज सकाळ पासून ह्या मुलाचा कसून शोध घेत होते.सायंकाळी ४ च्या सुमारास रेल्वे फिल्टर हाऊस जवळ त्याचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळला. ह्याच ठिकाणी एक करवत सुद्धा सापडली असून आरोपीबद्दल महत्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्यात चार मार्गांवर जनसुविधा केंद्रे उभारणार
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनधारकांना, विशेषतः महिलांना,...











