
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2026 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 12 वर्षी
छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रम ला गणेश भक्तांनचा उदंड प्रतिसाद
मनमाड – आम्ही परंपरा पाळतो… आम्ही संस्कृती चे रक्षण करतो…. ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सव ➖2026 निमित्ताने मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री नीलमणी मंदिरात यंदाही सलग 30 व्या वर्षी बुधवार दिनांक 23/09/2026 रोजी सकाळी ठीक 09-00 वाजता श्री सत्य विनायक महापूजा संपन्न झाली तसेच सलग 12 व्या वर्षी बुधवार दि.23 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता श्री निलमणी महागणपतीस छप्पन महाभोग (महानैवेद्य) अर्पण करण्यात आला व त्यानंतर आठ वाजता महाआरती करण्यात आली या मान्यवर पुरोहित च्या मार्गदर्शन नें संपन्न झालेल्या दोन्ही धार्मिक कार्यक्रमा ला मनमाड शहर व पंचक्रोशी तील गणेश भक्तांन नी उदंड प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमांचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त मंडळाने केले.











