loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र पोलीस भरती – १८३३१ पदांसाठी १२ लाखाहून जास्त अर्ज

Dec 3, 2022


मंगळवारी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीचा अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
या पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यभरातील 18 हजार पदांसाठी मंगळवापर्यंत 12,5000 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर मुंबईत सात हजार पदांसाठी चार लाख 29 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
वाढत्या बेरोजगारीमुळे या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर एवढी मोठी भरती आल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. शासनातर्फे 18 हजार 331 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मंगळवार पर्यंत राज्यभरातून 12 लाख 25 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहे. तर त्यातील 1,500000 अर्जदारांनी शुल्क भरले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रत्येक पदासाठी सरासरी 67 उमेदवारांनी अर्ज केला आहे.या पदासाठी बारावीपर्यंत शिक्षणाची अट असल्याने सुमारे 14 लाख अर्ज येणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यानी म्हटले आहे. मात्र अर्ज करणारे जवळपास 55 टक्के उमेदवार पदवीधर असल्याचे समोर आले आहे.
15 डिसेंबर पर्यंत अर्ज भरू शकता

ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने पोलीस भरतीचे अर्ज भरण्याची तारीख 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबर पर्यंत पोलीस भरतीसाठी अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय...

read more
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
.