loader image

प्रभाग क्रमांक सात व नऊ येथील होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

Dec 3, 2022


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू असलेला आनंदोत्सवातील आज तिसरा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 7 व 9 अंतर्गत माऊली रोड विनोद भाऊ ललवाणी यांच्या निवासस्थाना जवळील चौकात संपन्न झाला. आजचा होम मिनिस्टर कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमास प्रभागातील महिलांनी तुडूंब गर्दी केली होती, यात गृहिणी, बाल गोपाल तसेच वयोवृध्द मातांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली तसेच कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी करंजवण पाणी योजना कशी असणार आहे ,पाणी कसे येणार आहे यावर सविस्तर माहिती असलेली चित्रफित उपस्थित महिलांना दाखवली. विशेष म्हणजे या योजनेचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार असून या पुढे मनमाड कर माता भगिंनिंसाठी २ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ज्यात आपणास करंजवण मनमाड पाणी योजनेचे काम कसे सुरू आहे हे थेट तिथे जाऊन दाखवले जाणार असून यात आपला चहा नाश्ता व प्रवासखर्च आण्णा स्वखर्चातून देणार आहेत अशी माहिती दिली.
लवकरच प्रत्येकाच्या घरात नियमित पाणी येणार या आनंदाने अनेक महिलांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आण्णा व ताई यांचे आभार ही मानले.
आज झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात आले. विविध खेळातील प्रथम विजेत्यांना प्रत्येकी टिव्ही, डिनर सेट तसेच ट्रॉली बॅग देण्यात आली. सोबतच अनेक विजेत्यांना पैठण्या तर विविध बक्षिसे ही या वेळी महिलांनी प्राप्त केले.

विशेष महिला पुरस्कार
सौ राणी भंडारी व्यवसाय क्षेत्र, सौ गोविंदी विनोद वर्मा व्यवसाय क्षेत्र, लीलाबाई पंडितराव सोनवणे भजनी मंडळ, श्रीमती प्रिया राजपूत शिक्षिका, सौ पुष्पा मनोज खडांगळे समाजसेवा, सौ सविता चंद्रकांत आव्हाड समाजसेविका, सौ सुवर्णा बोरसे समाजसेविका, डॉक्टर प्रियांका भंडारी आरोग्य, सौ सुशीला बारसे सामाजिक उपक्रम, सौ सुनीता नेरकर सामाजिक उपक्रम, संगीता पराशर नर्स गव्हर्मेंट हॉस्पिटल, सौ डॉक्टर नीलिमा गुजराथी आरोग्य, श्रीमती जयश्री ताई बरडिया सामाजिक क्षेत्र, सौ राधा नंदकिशोर बागुल साडी डिझायनर, डॉक्टर प्रियंका छाजेड आरोग्य, सौ भागू गायकवाड समाजसेविका

प्रथम पुरस्कार
सौ दीपिका यश हिरण टीव्ही सेट
द्वितीय पुरस्कार सौ संगीता राजेंद्र खरे डिनर सेट
तृतीय पुरस्कार सौ श्वेता आशिष ललवाणी ट्रॉली बॅग

लकी ड्रॉ पैठणी विजेते
सौ कार्तिकी परदेशी, सायरा शेख, वंदना जगताप, संगीता खरे, रोहिणी पाटील, श्रद्धा सोपे, मालती गुजराथी, लीना वाघ
आजचा कार्यम यशस्वी करण्यासाठी शिवसेना, महीला आघाडी, युवासेना मनमाड शहर पदाधिकारी, शिवसैनिकांनी मेहनत घेतली.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.