loader image

आमदार कांदे यांनी घेतली सोनवणे कुटुंबीयांची भेट

Dec 5, 2022


आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे एकलव्य नगर येथील सोनवणे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली 1 लाख रुपये रोख मदत तर चार महिने पुरेल इतका धान्य व किराणा भेट दिली.
काही दिवसा पूर्वी मनमाड येथील एकलव्य नगर येथील लोकेश सुनील सोनवणे या बालकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. अतिशय हृदयद्रावक घटना माहिती पडताच सौ.अंजुम ताई कांदे यांनी तात्काळ या कुटुंबीयांची भेट देऊन पोलिसांना योग्य तपासा करिता सूचना देखील दिल्या होत्या. दोन तासात पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीस अटक केली होती व पुढील कारवाही करत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपण सदर घटना विशेष केस म्हणून फास्टट्रॅक मार्फत चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, सोबतच उज्वल निकम सारख्या अनुभवी वकिलांनी या केसचे काम पहावे म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आणि आरोपीस फक्त आणि फक्त फाशीचीच शिक्षा होईल असा पाठपुरावा करेन हा शब्द सोनवणे कुटुंबीयांना दिला.
सदरील कुटुंब हे कष्टकरी वर्गातील असून परिस्थिती अत्यंत नाजूक असल्या कारणाने या वेळी सौ.अंजुमताई कांदे यांनी मुलाच्या आईकडे रोख एक लाख रुपये सुपूर्द केले तर चार महिने पुरेल असा किराणा , तांदूळ. गहू अशी सामुग्री दिली.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेच्या आरोपीला शोधून काढल्याबद्दल त्यांचे कौतुक यावेळी आमदार यांनी केले.
याप्रसंगी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, डीवायएसपी समीरसिंग साळवे, तसेच एपीआय गीते साहेब, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल उपस्थित होते. तालुका प्रमुख साईनाथ गीडगे, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, जेष्ठ नेते राजाभाऊ भाबड, जिल्हा उप प्रमुख सुनीलभाऊ हांडगे,आमीन पटेल, राकेशशेठ ललवाणी,महीला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख उज्वलाताई खाडे,तालुका प्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीता ताई बागुल,पूजा छाजेड, वंदना शिंदे, राधाबाई मोरे,सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, गुलाब जाधव, काळू माळी, गोकुळ परदेसी, लाला नागरे, आप्पा आंधळे, दादा घूगे लोकेश साबळे, मूकुंद झालटे मिलींद पाथरकर, अज्जू शेख, सिध्दार्थ छाजेड, आजिंक्य साळी,सचिन दरगुडे, आनंद दरगुडे, ललीत रसाळ शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.