Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

के आर डी हायस्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

Dec 6, 2022

के आर टी हायस्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत विनम्र अभिवादन करण्यात आले. इयत्ता सातवी व इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यावेळेस मुख्याध्यापक दीपक व्यवहारे,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी,विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते .इयत्ता दुसरीच्या अर्णव राजेश भावसार,सृष्टी राजेंद्र संसारे या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली .इयत्ता पहिली ची सायुरी संदीप केदारे या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मत मांडले. खुशी वाजे या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव सुहास जाधव या विद्यार्थ्यांने केले. या विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर सर व सौ. ऋचा शिंपी या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

अजून बातम्या वाचा..

खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन

खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन

मुंबई,नाशिक,दि.१० ऑक्टोबर:- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे...

read more
८७ व्या धर्मांतर घोषणा दिनानिमित्त १५ वा मुक्ती महोत्सवाचे आयोजन  ११,१२,१३ ऑक्टोबर २०२२ रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

८७ व्या धर्मांतर घोषणा दिनानिमित्त १५ वा मुक्ती महोत्सवाचे आयोजन ११,१२,१३ ऑक्टोबर २०२२ रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

येवला ( प्रतिनिधी) मानव मुक्तीच्या गर्जनेने जगप्रसिद्ध झालेल्या मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]