loader image
[ays_poll id=7]

मनमाड मध्ये ९ डिसेंबर पासून रंगणार कबड्डी चा थरार

Dec 8, 2022


मनमाड
नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७० वी जिल्हा अजिंक्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक मनमाड येथे येत्या ९ डिसेंबर पासुन सुरू होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक मोहनअण्णा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पगारे सदस्य सतिष सूर्यवंशी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे घेतली जाणारी ७० वी जिल्हा अजिंक्य कबड्डी स्पर्धा यंदा नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखली मनमाड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगणावर येत्या ९ ते ११ डिसेंबर या तीन दिवसांत संपन्न होणार असुन या स्पर्धेत एकुण ४४ पुरूष संघ तर २२ महिलाचे संघ उपस्थित राहणार असुन यांच्यात जवळपास ८५ ते ९० सामने खेळवले जाणार आहेत यामधुन २२ खेळाडूंची निवड करून त्या खेळाडूंना नाशिक येथे सराव शिबिरात पाठवले जाणार आहे त्यातून १२ जणांचा संघ निवडून अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत तो संघ खेळणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे, राजेंद्र पगारे, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जयंत जाधव, उदय सांगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम सर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. दिवस रात्र पध्दतीने हे सामने खेळवले जाणार आहे.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.