loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश गुरुवार दि. ८ डिसेंबर रोजी पारित करण्यात आला.

Dec 9, 2022



मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आज हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड पाणीपुरवठा योजनेची कार्यारंभ आदेश प्रत ( Work Order) आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्फत या योजनेचे कॉन्ट्रॅक्टर इगल कन्स्ट्रक्शन चे प्रतिनिधी विनय चूक यांच्याकडे सोपवली, सोबतच 78 खेडी पाणीपुरवठा योजनेची कार्यारंभ आदेश प्रत स्वीकारली .(56+नवीन 22 नवीन गावांचा समावेश यात केला आहे)
याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यासह मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथे मुख्यमंत्री निवासस्थानी उपस्थित होते.
गेले कित्येक वर्षांची मनमाड शहराची पाणीटंचाईचा विषय हा सर्वश्रुत असून आमदार सुहास आण्णा कांदे यांनी हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी जिकीरीचे प्रयत्न केले. संबंधित प्रत्येक शासकीय खात्यांकडे सतत योजने संदर्भात पाठपुरावा केला. योजनेसाठी येणाऱ्या विविध अडथळ्यांना तोंड देत आमदार सुहास कांदे यांनी योजने च्या यशस्वीतेसाठी लागेल तो प्रयत्न केला. अखेर आज मनमाडकर माता भगिनींच्या स्वप्नपूर्तीचा सुवर्ण दिवस ठरला असून करंजवण मनमाड पाणीपुरवठ्याचा कार्यारंभ आदेश पारित मनमाडकर व्यापारी, जनतेसाठी, माता भगिनीं साठी उज्वल भविष्याचा हा संकेत आहे.
सदर योजनेचा शासकीय कालावधी 30 महिन्यांचा असून आमदार सुहास कांदे यांनी हेच काम 17 ते 20 महिन्यात पूर्ण करून घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे आणि आता लवकरच करंजवण मनमाड पाणीपुरवठ्याची भूमिपूजन नाही मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मनमाड येथे लवकरच संपन्न होणार आहे.
मनमाड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावत असतानाच आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहरात उद्योग व्यवसायाला चालना मिळावी म्हणून एमआयडीसी साठी प्रयत्न चालू ठेवले आहेत आणि पाण्याची उपलब्धता, एमआयडीसी साकारण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. लवकरच संबंधित मंत्री हे एमआयडीसी निर्मितीबाबत घोषणा करणार असल्याचीही शक्यता आहे.
मतदार संघात चौफेर पाणी योजना मंजूर करून आमदार सुहास कांदे यांनी संपूर्ण मतदारसंघात येत्या काही महिन्यात प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील प्रमुख गरज म्हणजे पाणी उपलब्ध करून देण्याचा शब्द खरा करून दाखवला आहे.

याप्रसंगी उपस्थितांमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे संग्राम बच्छाव महेंद्र दुकळे राजाभाऊ भाबड, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, पंकज निकम, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, भाजपा जिल्हा संघटक नितीन पांडे शहर प्रमुख जयपुर वाणी, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान उपजिल्हाप्रमुख सुरेश शेलार, ज्ञानेश्वर कांदे, धनंजय कांदे, महावीर ललवाणी, भरत पवार आबा देवरे, नारायण पवार एकनाथ बोडके, महेश बोराडे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.