मनमाड : (योगेश म्हस्के) येथे नाशिक जिल्हा कबड्डी असो. आणि नांदगाव तालुका कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगनावर दि. 9 ते 11 डिसेंबर दरम्यान आमदार चषक अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा कबड्डी असो. कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे , प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड , रिपाइं नेते गंगादादा त्रिभुवन , रवींद्र घोडेस्वार आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते काल 9 डिसेंबर रोजी या स्पर्धेचे उदघाटन होऊन सुरवात झाली असुन उद्या दि.11 डिसेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे , या स्पर्धेत एकुण 48 पुरुष आणि 14 महिला संघ सहभागी झाले असुन 60 पुरुष तर 20 महिला असे एकुण 80 सामन्यांचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेमधुन एकुण 22 खेळाडूंची निवड होणार असुन यातील 12 खेळाडूंना राज्य अजिंक्यपद चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये नाशिक जिल्हा कबड्डी संघामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. या कबड्डी स्पर्धेला शहरातील क्रिडा प्रेमींची देखील पसंती मिळत असुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे सदस्य रमेश केदारे , राजु डमरे , वाल्मीक बागुल , विलास मोरे , शाकिर शेख , रेहमान शेख आणि नाशिक जिल्हा व नांदगाव तालुका कबड्डी असो. सर्व सदस्य , पंच मंडळ परिश्रम घेत आहे.









