loader image
[ays_poll id=7]

निमित्त झाले थुंकण्याचे अन् एकाला गमवावा लागला जीव

Dec 11, 2022

आताच्या जमान्यात कुठल्या कारणावरुन वाद होईल ह्याचा काही नेम नाही. कैफ खान रस्त्यावरुन चालत असताना रस्त्यावर थुकला तोच मागुन दुचाकीवरुन येणाऱ्या विजय पाटवा नावाच्या अंगावर ही थुंकी पडली. दुचाकीस्वार विजयने गाडी थांबवत अंगावर का थुकलास असा सवाल विचाराला, तोच कैफ आणि विजयमध्ये शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली आणि कैफ विजयच्या अंगावर धावला आणि दोहोंमध्ये हाणामारी सुरु झाली. यात कैफने विजयला गंभीर मारहाण केली. जखमी अवस्थेत विजय खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन बेशुध्द झाला. यानंतर विजयला जवळच्या इस्पितळात दाखल केले असता डोक्यावर मार लागल्याने विजयला मृत घोषित केले. विजय आणि कैफच्या या मारामारीचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून

याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात कैफ खान विरोधात गुन्हा दाखल झाला आहे व त्याला अटक करण्यात आली आहे. या मारामारीत विजय पाटवा यांचा मृत्यू झाल्याने कैफ विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. कैफ याला आज न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे डोंबिवलीत खळबळ माजली आहे.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं...

read more
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज अयोध्या येथे प्रभू...

read more
सारथी मित्र मंडळ तर्फे सन 1990 व 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात  सक्रिय सहभाग घेतलेल्या कारसेवकां चा गौरव

सारथी मित्र मंडळ तर्फे सन 1990 व 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या कारसेवकां चा गौरव

मनमाड - आज समस्त विश्वातील हिंदूना गर्व अभिमान वाटेल असा ऐतिहासिक क्षण श्रीराम जन्मभूमी मुक्त झाली...

read more
बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

मनमाड - ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे विश्वातील समस्त हिंदू धर्माला...

read more
टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

याप्रसंगी 1008 श्रीफळांनी श्रीराम या नावाची आरास काढण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे...

read more
.