loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरित करण्याची मागणी – मनमाड ला दोन शिवभक्त बसले आमरण उपोषणाला

Dec 12, 2022


मनमाड शहरातील श्री छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत सतत होणारी टाळाटाळ आणि दिरंगाई तसेच प्रशासनाकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षा विरोधात मराठा समाजाचे नाना आबाजी शिंदे आणि विष्णू शंकर चव्हान हे आज पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणास बसले आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मनमाड मध्ये गेल्या कित्येक वर्षापासुन अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे. जेव्हापासुन महाराजांचा अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे तेंव्हापासुन आजपर्यंत या पुतळयाच्या सुशोभिकरणा विषयी मनमाड नगर परिषदेमार्फत कुठेही लक्ष दिले गेलेले नाही. वा याबाबत पालिकेने कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. याबाबत गेल्या १० ते १५ वर्षापासुन अनेक संघटनांनी व त्यांचे कार्यकर्ते यांनी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत मागणी करून निवेदने दिली असुन देखील पालिकेकडुन त्यास प्रतिउत्तर म्हणुन फक्त आश्वासणेच मिळाली प्रत्यक्षात कृती झालेली नाही.

मागील शिवजयंतीला म्हणजे १९ फेब्रुवारी २०२२ ला सांगितले गेले की येत्या चार महीन्यात महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण होईल. यासाठी नाशिकच्या शिवभक्ताला याविषयीचे डिझाईन व आराखडा करून देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु चार महीने होऊन देखील याबाबत पालिकेतर्फे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे टेंडर पास केलेले नाही वा सुशोभिकरण्याच्या कामास सुरुवात केली असे दिसत नाही.

महाराजांची जयंती जवळ येत आहे तरी याबाबत प्रशासनाकडुन कोणतीही दखल घेतली गेलेली नाही व आख्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या महाराजांच्या विषयी असे राजकारण होत असेल तर याच विषयाचा राग, संताप मनमाड मधील सर्व शिवभक्त यांना आहे. सर्व शिवभक्त याविषयी सुशोभिकरणाचे काय झाले असा प्रश्न करीत आहेत. परंतु पालिकेमार्फत वा लोकप्रतिनिधींमार्फत याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नसून शिवभक्त नाना आबाजी शिंदे व श्री विष्णु शंकर चव्हाण हे दोघेही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे सुशोभिकरण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसले आहेत. होणाऱ्या परिणामांस मनमाड नगर पालिका जबाबदार असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.