loader image
[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे एकदिवसीय हिवाळी मूल्य संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

Dec 13, 2022

मनमाड 🙁 योगेश म्हस्के )श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) मनमाड येथे ‘बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत’ एक दिवसीय ‘मूल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर’ संपन्न झाले , यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यामध्ये अनेक शालेय मुला-मुलींना आपले कलागुण सादर करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले , लहान मुलांना माहितीसाठी विविध प्रकारचे स्टॉल जसे औषधी वनस्पती , कडधान्यचे प्रकार , मसाल्याचे प्रकार , डाळींचे प्रकार , विविध प्रकारची वृक्ष व भाजीपाला , भौमितिक आकार , विविध प्रकारच्या चवीचे प्रकार , पारंपारिक व आरोग्यदायी घरगुती उपकरणे इत्यादी चे स्टॉल लावण्यात आले होते. मुला मुलींना तसेच पालकांना केंद्रात दर रविवारी सुरू असलेल्या बालसंस्कार वर्गाबद्दलची माहिती व महत्त्व सांगण्यात आले. सदर शिबिरात केंद्रातील बालसंस्कार विभागात कार्य करणाऱ्या सेवेकरी यांनी या शिबिराचे नियोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मूल्य संस्कार , शिस्त , सूर्यनमस्कार , योगासने , व्यायाम , स्तोत्र-मंत्र आदींचे महत्त्व सांगण्यात आले, तसेच विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

यावेळी दर रविवारी केंद्रात सुरू असलेल्या बालसंस्कार वर्गास सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले , शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालक यात सहभागी झाले होते , महाप्रसादाने या शिबिराची सांगता करण्यात आली .

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.