loader image
[ays_poll id=7]

जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा – ब्रम्हा स्पोर्ट्स आणि क्रीडा प्रबोधिनीने मारली बाजी

Dec 13, 2022


मनमाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगणावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित ७० व्या पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ४५ पुरुष तर १२ महिलांचे संघ सहभागी झाले होते. रविवारी अंतिम सामन्याचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील हजारो कबड्डीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

उपांत्य फेरीच्या पुरुष गटाच्या सामन्यात ए झोनमध्ये ब्रम्हा ( आडगाव) संघाने भैरवनाथ( पांढुर्ली) संघाचा ३६-३८ असा पराभव करीत अंतिम लढतीत मजल मारली तर बी झोनमध्ये अतिशय चुरशीच्या लढतीत नाशिक रोड च्या बालाजी संघाने शंभो (जिव्हाळे) संघाचा ३४-३३ असा निसटता पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या सेमी फायनल मध्ये ए झोनमध्ये बालाजी (नाशिक रोड) संघाने रचना (नाशिक) संघाचा ३५-६ असा एकतर्फी पराभव केला तर बी झोनमध्ये क्रीडाप्रबोधिनी (नाशिक) संघाने के उत्तमराव ढिकले (सैय्यदपिंप्री) संघाचा ३७-२९ असा ८ गुणांनी पराभव करीत अंतिम लढतीत प्रवेश केला. आमदार सुहास कांदे चषक व इतर पारितोषिकांचा वितरण समारंभ त्यानंतर संपन्न झाला. पुरुष व महिला गटामध्ये ए झोन आणि बी झोन पाडून साखळी व बाद पद्धतीने या स्पर्धा खेळविण्यात आल्या व त्यातून अंतिम लढत झाली. झोन ‘अ’ व झोन ‘ब’ मधून उपांत्य फेरीसाठी निवडण्यात आलेल्या दोन्ही संघामध्ये अंतिम सामना होऊन त्यात विजयी होणाऱ्या संघास आमदार सुहास कांदे चषक व प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे प्रमुख कार्यवाहक मोहन गायकवाड, सतिष सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे, राजेंद्र भाबड, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, वाल्मिक आंधळे, निलेश व्यवहारे, रिपाई नेते गंगादादा त्रिभुवन, स्वारीपचे शहराध्यक्ष संजय भालेराव, रवींद्र घोडेस्वार, पापा थॉमस तसेच असोसिएशनचे अशोक गरूड, बाळासाहेब जाधव, समितीचे सदस्य वाल्मीक बागुल, रेहमान शेख, विलास मोरे, शाकीर शेख, राजू उमरे, रमेश केदारे व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व सदस्य तसेच नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सदस्य व पंच मंडळ यांनी या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

स्पर्धा निकाल.

पुरुष विभाग
प्रथम क्रमांक ब्रह्मा स्पोर्ट्स आडगाव

दुसरा क्रमांक बालाजी फोन्डेशन ना रोड

तिसरा क्रमांक भैरवनाथ क्रीडा मंडळ पांदुल

महिला विभाग

प्रथम क्रमांक क्रीडा प्रबोधिनी नाशिक दुसरा क्रमांक बालाजी फोन्डेशन ना रोड

तिसरा क्रमांक के उत्तमराव ढिकले क्रीडा मंडळ सय्यद पिंपरी

या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचा निवडण्यात आलेला प्राथमिक संघ

पुरुष विभाग…

१. ओमकार पोकळे २ अक्षय देशमुख (ब्रह्मा स्पोर्ट्स). ३. समर्थ आहेर (श्रीसाई स्पोर्ट्स) ४ रितेश बिरारी (युवा स्पोर्ट्स) ५. कुलदीप सोनवणे (स्वस्तिक फोन्डेशन) ०६. भूषण सानप (क्रीडा प्रबोधिनी निफाड) ७. विशाल वाजे ८. अमीत पवार (भैरवनाथ पांडुर्ती) ९. पवण भोर १०. नितेशकुमार (बालाजी नारोड) ११. आंतक कलापुरे (सम्राट मनमाड) १२. तुषार ढिकले (उत्कर्ष सेव्यद पिंपरी) १३. पवण गांगुर्डे (एकलव्य मनमाड) १४. जयेश पाटील (रुद्रा सिन्नर) १५. ऋषिकेश गडाख १६. भारत जाधव (रौद्र शंभो जिव्हाळे) १७. प्रसाद दरगुडे (मनमाड बॉईज) १८. पंकज ढिकले (कै. उत्तमराव ढिकले सय्यद पिंपरी) १९. फेजूल रहेमान (ग्रामीण पोलिस) २०. किश खेरनार (क्रीडा प्रबोधिनी नाशिक)

महिला विभाग…..

१. ज्योती पवार २. सुनंदा पवार ३. रंजना वसावे ४, अक्षदा धामणकर ५. मालती गांगुर्डे (सर्व क्रीडा प्रबोधिनी नाशिक) ६. पूजा कुमावत ७. पावणी निकम. ८. गायत्री काठे ९. दिशा कदम (बालाजी फोन्डेशन नारोड) १०. पौर्णिमा शिंदे ११. वैष्णवी राजोळे १२. पल्लवी ढिकले (के. उत्तमराव ढिकले क्रीडा मंडळ सय्यद पिंपरी) १३. वैष्णवी शिंदे १४. आरती शहा ( शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगाव) १५. फरदीन सय्यद १६. राखी मिश्रा १७. सानिका गांगुर्डे ( रचना क्लब नाशिक) १८. प्रणाली पाटील १९. नंदीनी महाले (श्री साई स्पोर्ट्स नाशिक) २०. अनुराधा पिंपळे (आदीवासी क्रीडा (प्रबोधिनी नाशिक)


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.