loader image
[ays_poll id=7]

मोहेगाव येथील ग्रामसेवकाला निलंबित करण्याची आदिवासी ग्रामस्थांची मागणी

Dec 15, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील मोहेगाव येथील ग्रामसेवक एस जे कदम यांना निलंबित करावे यासाठी मोहेगाव येथील आदिवासी सरपंच ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या दालनासमोर ठिय्या मारत आंदोलन केले आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी नेते भावराव बागुल यांनी केले.

मोहेगाव ग्रामपंचायत कार्यालयात कर्तव्यावर असलेले ग्रामसेवक एस जे कदम हे गावातील आदिवासी समाज बांधवांशी जातिवाद करून आदिवासी समाज बांधवांना हीन वागणूक देत असल्याचा आरोप आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे मोहेगाव येथील सरपंच आदिवासी महिला असल्याने ग्रामसेवक त्यांच्याशी देखील जातिवाद करून सरपंचांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप आदिवासी ग्रामस्थांनी करत कदम यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी विस्तार अधिकारी विजय ढवळे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर भावराव बागुल, सरपंच सुमनबाई थेटे,अनिता थेटे, सोनाली सोनवणे,ताई बरडे,राधा थेटे, रुपाली ठाकरे,काऴुबाई मोरे सह गावकरी यांच्या स्वाक्षरी आहेत.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.