loader image
[ays_poll id=7]

अनकाई येथील आराधना उद्यान केंद्रात रक्तदान शिबीरात 53 रक्तदात्यांचे रक्तदान

Dec 17, 2022

मनमाड :- प.पू.गुरुदेव हसमुख मुनीजी महाराज साहेब यांच्या ७९ व्या जयंती दिनानिमित्त आराधना उद्यान केंद्र अनकाई येथे झालेल्या रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
या ४0 व्या रक्तदान शिबीराचे उदघाटन प्रसिध्द साहित्यिक व पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील दिनेशभाई पारेख होते. सूत्रसंचालन कल्पेश देसाई ( पुणे ) यांनी केले.

संदीप देशपांडे यांचा परिचय शतकवीर रक्तदाते प्रदीप गुजराथी यांनी करुन दिला.

याप्रसंगी देशपांडे म्हणाले की, मन शांत ठेवायचं असेल , जीवनात आनंदी व्हायचं असेल तर माणूस जोडणं महत्वाचं आहे. या दुनियेत जीव घेणारे खूप आहेत पण जीव देणारे , जीवनदान देणारे माणसं येथे आहेत.
४० वर्षात सातत्याने , अखंडपणे ऐकाच दिवशी, एकाच ठिकाणी शिबीर भरवणे हा महाराष्ट्रात विक्रम असेल असे त्यांनी सांगितले. जीवनात माणूसपणं जपणं अत्यंत महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेशभाई म्हणाले की, प.पू.हसमुख मुनीजी म.सा.यांनी आपणास निष्काम कर्मयोग शिकविला. प्रवृत्ती , निवृती आणि विरक्ती यांचा संगम म्हणजे जीवन होय. दुसऱ्यासाठी जगणं आधिक सुंदर असतं.
नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीतर्फ रक्तसंकलन करण्यात आले.पोपटशेट बेदमुथा यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.