loader image

व्ही. जे हायस्कुल नांदगाव येथे एकांकिका स्पर्धा संपन्न

Dec 19, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जेष्ठ रंगकर्मी कै.वा.श्री. पुरोहित यांच्या स्मरणार्थ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते हे या स्पर्धेचे ४३ वे वर्षे होते . अशा प्रकारच्या नाट्य स्पर्धा घेणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव शैक्षणिक संस्था आहे.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा ,बालवयातच या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनयाचे धडे मिळावे व ग्रामीण ते शहरी अशा सर्व स्तरातील विद्यार्थांना अभिनयासाठी व्यासपीठ मिळावे हा खरा स्पर्धेचा हेतू आहे.या स्पर्धा व्ही.जे.हायस्कूलच्या रंगमंचावर नांदगाव संकुलातील एकांकिका उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी दर्शन आहेर ,सम्राट चव्हाण होते तर अध्यक्ष स्थानी छाजेड विद्यामंदिर शालेय समिती अध्यक्ष विजय परदेशी होते. संस्था एकांकिका स्पर्धा प्रमुख हेमंत देशपांडे ,राहुल मुळे संकुलातील मुख्याध्यापक शांताराम उफाडे,संजय दिक्षित ,केशव पाटील मुख्याधापिका संजीवनी निकुंभ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोहर बडगुजर उपमुख्याध्यापक श्री दिपक बाकळे ,पर्यवेक्षक श्री मनोहर शिंदे,संकुल स्पर्धा प्रमुख विजय चव्हाण,टी एम. भैय्यासाहेब चव्हाण,भास्कर मधे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुरवातीला जेष्ठ रंगकर्मी कै.वा.श्री.पुरोहित व नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी केले. प्रास्ताविकेत या स्पर्धेविषयी माहिती दिली.प्रमुख पाहुण्याच्या हस्ते श्रीफळ फोडून नाट्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले पाहुण्याचा परिचय गुलाब पाटील यांनी करून दिला. आभार सुनिता देवरे यांनी मानले.
या स्पर्धेचे नियोजन,संकुल स्पर्धाप्रमुख विजय चव्हाण, भैय्यासाहेब चव्हाण, भास्कर मधे ,यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेत नांदगाव संकुलातील छाजेड विद्यामंदिर शाळेने “आम्ही मुले नव्या युगाची” ही एकांकिका सादर केली.
याचे दिग्दर्शन आशादेवी सोनवणे यांनी केले. सरस्वती विद्यामंदिरने तिमिराकडून तेजाकडे ही एकांकिका सादर केली सादर केली. याचे दिगदर्शन अश्विनी नरवडे यांनी केले. माध्य.विद्या.सावरगाव शाळेने “अबब.. विठोबा बोलू” याचे दिग्दर्शन भरत काकळीज यांनी केले.किसान माध्य.विद्यालय वाखारी यांनी हम होंगे कामयाब ही एकांकिका सादर केली या एकांकिकेचे दिग्दर्शन ऋषिकेश डोमाडे यांनी केले, व्ही.जे.हायस्कूल शाळेने जयंत मिसर दिग्दर्शित पाडवा गोड झाला ही एकांकिका सादर केली.नांदगाव संकुलातून छाजेड विद्यामंदिर शाळेने सादर केलेली आम्ही मुले नव्या युगाची
या एकांकिकेला संकुलातून प्रथम क्रमांक मिळविला .या सर्व एकांकिकांना चांगला प्रतिसाद मिळाला. आलेल्या परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले . या एकांकिकेचे परीक्षण नाट्य क्षेत्रातील कलाकार जयदीप पवार , महेंद्र चौधरी ,किरण राव यांनी केले.सादर झालेल्या प्रत्येक एकांकिकेत उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या कलाकाराला मान्यवराच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील प्रत्येक नाटकातील अभिनयाचे बक्षीस देण्यात आले .
आम्ही मुले नव्या युगाची (स्व.मि.भि.छाजेड विद्यामंदिर ,नांदगाव)
ह्या एकांकिकेला संकुलात प्रथम मिळाला.
प्रथम-वेदश्री सुनिल पाटील व्दितीय- अंकिता मनोज पाटील तृतीय-भक्ती निलेश गायकवाड
तिमिराकडून तेजाकडे (सरस्वती विद्यामंदिर,मनमाड)
प्रथम- यश पवन पवार व्दितीय-गौरी रविंद्र कांडेकर तृतीय-गोपिका नारायण जाधव
अबब.. विठोबा बोलू (मध्य.विद्या.सावरगाव)
प्रथम- मनोज कोल्हे व्दितीय- वैष्णवी गव्हाणे तृतीय- वैष्णवी शेलार
हम होंगे कामयाब (कि.माध्य.विद्यालय,वाखारी)
प्रथम- राजनंदिनी पांडुरंग चव्हाण व्दितीय- अपेक्षा राकेश चव्हाण तृतीय- वेदांत देवचंद सोनवणे
पाडवा गोड झाला (व्ही.जे.हायस्कूल,नांदगाव)
प्रथम – लेहर नवल जैन व्दितीय – अनुष्का केशव नागरे तृतीय- उर्वी प्रमित आहेर


अजून बातम्या वाचा..

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
.