loader image

मनमाडसह बाजार समित्यांच्या निवडणुका ३ जानेवारी पर्यंत पुन्हा स्थगित

Dec 23, 2022


जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत शुक्रवारपासून ता. २३ बाजार समितीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार असतानाच बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे. नागपूर खंडपीठात झालेल्या ४४ बाजार समित्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत ३ जानेवारी २०२३ पर्यंत निवडणुका स्थगित ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

राज्यासह जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. यात २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होऊन २९ जानेवारी २०२३ ला बाजार समितीसाठी मतदान होणार होते.

बाजार समित्यांच्या निवडणुका ३ जानेवारीपर्यंत घेऊ नये, असे आदेश असल्याने स्थगित आहे. राज्यभरातून विविध बाजार समित्यांनी दाखल केलेल्या याचिका तसेच राज्य शासनाच्यावतीने देखील नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रक दाखल केले आहे. यावर ३ जानेवारी २०२३ ला अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. यातच निवडणुका पुढे घेण्यात येईल की नाही, याबाबत आदेश मिळण्याची शक्यता आहे.
लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड, कळवण, मनमाड, नांदगाव, सिन्नर, घोटी, देवळा, सुरगाणा, दिंडोरी, मालेगाव या बाजार समित्यांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.