पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी आणि त्यांचे कुटुंबीय काल म्हैसूर येथे झालेल्या कार अपघातात जखमी झाले. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. अपघाताच्या वेळी कारमध्ये चालका व्यतिरिक्त प्रल्हाद, त्यांचा मुलगा, सून आणि एक लहान मूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रल्हाद यांना काही किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना जे.जे.एस. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना कडकोलाजवळ दुपारी दीडच्या सुमारास घडली. बांदीपूरच्या दिशेने जाणारी प्रल्हाद यांची कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली आहे.