महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ७८ असून त्यापैकी पदवीधरच्या दोन आणि तीन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला असून नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार असून, २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. याबाबत ५ जानेवारीला अधिसूचना निघणार आहे. तसेच पदवीधरचे दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार असून अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही पार पडणार आहे.
यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. ह्या ठिकाणी आता कोणा कोणाला उमेदवारी मिळते आणि कुणाचा पत्ता कट होतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राशी भविष्य : २१ जुलै २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....